Virat Kohli : ‘विराटने कितीही प्रयत्न केले तरी…,’ सचिनचा उल्लेख करत ब्रायन लाराचं कोहलीला थेट आव्हान, म्हणाला ‘उगाच छातीठोकपणे…’

Virat Kohli : सचिन तेंडुलकरने स्वतः सांगितले होते की, त्याचा १०० शतकांचा विक्रम विराट कोहली किंवा रोहित शर्मा मोडू शकतात. रोहित आणि विराट भारतीय संघात तरुण असताना सचिनने हे सांगितले होते.

आता जसजसे क्रिकेट पुढे जात आहे तसतसे हे स्पष्ट झाले आहे की सचिन तेंडुलकरचा विक्रम कोणी मोडू शकत असेल तर तो फक्त विराट कोहली आहे. पण आता वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा म्हणाला की सचिनचा विक्रम मोडणे कोहलीसाठी खूप कठीण जाईल.

कोहलीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाद्वारे वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 50 शतके झळकावण्याचा विक्रम केला होता. सध्या कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतके झळकावली आहेत, ज्यामुळे तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

पण अनुभवी ब्रायन लारा म्हणाले की, हे तर्क संगत नाही. वेस्ट इंडिजचा दिग्गज म्हणाला, “कोहली आता किती वर्षांचा आहे? 35 ना? त्याच्याकडे 80 शतके आहेत आणि अजून 20 शतकांची गरज आहे.

जरी त्याने दरवर्षी 5 शतके झळकावली तरी सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी त्याला 4 वर्षे लागतील आणि तोपर्यंत तो 39 वर्षांचा होईल. अवघड, खूप अवघड काम.” पुढे बोलताना ब्रायन लारा म्हणाला, “रिकॉर्ड कोणीही तोडू शकणार नाही, हे खात्रीने सांगू शकत नाही.

कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडेल, असे जे म्हणत आहे ते क्रिकेटच्या तर्कावर बोलत नाहीत. 20 शतके खूप दूर दिसते. बहुतेक खेळाडू त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 20 शतके झळकावू शकतात. मी उत्तेजित होणार नाही आणि म्हणणार नाही की कोहली तो मोडेल.

ब्रायन लारा पुढे म्हणाला, “फक्त कोहली जवळ येऊ शकतो. मी त्याच्या शिस्तीचा आणि समर्पणाचा खूप मोठा चाहता आहे. ज्या पद्धतीने तो आपले सर्वस्व देऊन सामन्याची तयारी करतो, तुम्ही त्याचे चाहते कसे होऊ शकत नाही. माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत.


सचिन तेंडुलकरप्रमाणे त्याने 100 शतके झळकावली तर मला खूप आनंद होईल. सचिन माझा जिवलग मित्र होता आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे मी कोहलीचा खूप मोठा चाहता आहे.”