सत्तर वर्षीय भारत आरते हे त्यांच्या मुलीच्या लग्न समारंभानंतर रिक्षामधून परत येत होते. त्यांच्या बॅगेत सोन्या-चांदीचे दागिने होते. मात्र रिक्षातून उतरताना ते नेमके ती बॅग काढायलाच विसरले. नंतर त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने मोठा गोंधळ उडाला.
त्यांनी लगेच एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कार्यवाही केली. यामुळे त्यांना त्यांचे दागिने परत मिळाले. बोरिवलीतील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी पोलिसांनी तासाभरात आठ कोटी रुपयांच्या वस्तू असलेली बॅग शोधून काढली.
दरम्यान, रिक्षात आपली बॅग विसरुन गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ते रिक्षाचा माग काढण्यात आणि मौल्यवान वस्तू परत मिळवण्यात यशस्वी झाले. यामुळे त्यांच्या जीवात जीव आला.
हा प्रवासी आठ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू असलेली बॅग वृद्ध प्रवासी रिक्षात विसरला. रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळाने जेव्हा त्याला याची आठवण झाली, तेव्हा त्याला अक्षरशः ब्रह्मांड आठवले. यामुळे ते टेंशनमध्ये होते.
पोलिसांच्या कृपेने त्याला त्याचा ऐवज जसाच्या तसा परत मिळाला. तोही अवघ्या काही तासांच्या आत. यामुळे त्यांचा आनंद गगनाला मावला होता. रिक्षा चालकाने देखील याबाबत कसलाही मनात संकोच न ठेवता ती बॅग परत दिली.
या सगळ्या घडामोडींमध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. यामुळे त्यांना त्यांचा ऐवज मिळाला. यामुळे पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. यामुळे हा कुटूंबाला त्यांना त्यांचा ऐवज मिळाला आहे.