Soumya Viswanathan : दिवंगत पत्रकार सौम्या विश्वनाथन यांचे वडील एमके विश्वनाथन यांचे शनिवारी ९ डिसेंबर रोजी निधन झाले. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीच्या साकेत कोर्टाने सौम्या हत्याकांडातील चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येतील पाचपैकी चार दोषींना २५ नोव्हेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर पाचव्या दोषीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची २००८ मध्ये हत्या झाली होती. सौम्याचे 82 वर्षीय वडील एमके विश्वनाथन यांना सुनावणीच्या दोन दिवस आधी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पाच आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा एमके विश्वनाथन यांना आयसीयू मध्ये न्यायालयीन कामकाज ऑनलाइन दाखवण्यात आले. कुटुंबाने न्यायालयाला माहिती दिली की तो “दु:खी होता परंतु शिक्षा पाहण्याची इच्छा व्यक्त केली,” असे अहवालात म्हटले आहे.
एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची 30 सप्टेंबर 2008 रोजी सकाळी दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्गावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ती कामावरून घरी परतत असताना ही घटना घडली.
या घटनेमागे दरोडा असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (MCOCA) तरतुदींनुसार संघटित गुन्हेगारी केल्याबद्दल दोषी ठरवले.
दोन आठवड्यांपूर्वी सौम्या प्रकरणातील दोषींना न्यायालयाने शिक्षा सुनावली तेव्हा एमके विश्वनाथन न्यायालयात उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी माधवी विश्वनाथनही होती.
मुलीच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी वडिलांनी तब्बल 15 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या मारल्या. न्यायाच्या या संघर्षात त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, पण ते आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यावर ठाम राहिले.