शरद पवारांना सर्वात मोठा धक्का! राहीलेल्या सातही आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट अजित पवारांचा आहे, तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. राज्यातील अनेक आमदार अजित पवारांच्या गटात गेले आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला होता. आता शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

नागालँडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार होते. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपण अजित पवारांसोबत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.

नुकतीच नागालँडमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आले होते. आता त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या पाठिंब्यामुळे शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपुर्ण राज्यातील कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर आम्ही अजित पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्ष मजबूत करणार आहोत, असे नागालँडच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी म्हटले आहे.

तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रजमोहन श्रीवास्तव म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष वान्युंग ओडिओ यांनी नवी दिल्लीत जाऊन राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही त्यांनी भेट घेतली आहे. त्यावेळी आपल्या आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी ओडिओ यांना पक्ष मजबूत करण्यासाठी काही सल्ले दिले आहेत. मार्गदर्शन करण्याचे आश्वासनही दिले आहे. तसेच राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांना नेहमी प्रमाणे काम करण्याच्या सुचनाही प्रफुल्ल पटेल यांनी दिल्या आहेत, असे ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.