Nagpur News: नागपूरमधील खापा येथे कनक कॉटन इंडस्ट्रीजमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. याठिकाणी कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून या दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला.
मशीन बंद पडून काम थांबल्याने हे दोघेही तरुण कापसाच्या ढिगार्यावर जाऊन झोपले. हीच क्षणभराची विश्रांती या कामगारांच्या जिवावार बेतली. यामुळे या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याठिकाणी कंपनीत जिनिंगचे काम सुरू असताना मशीनमध्ये बिघाड झाल्याने काम बंद पडले. काम बंद पडल्याने बिरमराम देदाराम भिल, पंकज मंगिलाल भिल हे दोघेही कामगार आराम करत होते. असे काही होईल, याचा कोणालाही अंदाज आला नाही.
हे दोघेही कापसाच्या ढिगार्यावर जाऊन झोपले होते. झोपेत असतानाच कापसाचा ढीग कोसळल्याने दोघेही त्याखाली दबून राहिले. त्यात गुदमरून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत लगेच ही माहिती देखील कोणाच्या लक्षात आली नाही.
दरम्यान, नंतर सकाळी जेव्हा इतर मजूर कामावर आले, तेव्हा त्यांना शंका आली आणि शोधा शोध सुरू झाली. यावेळी घडलेला हा प्रकार समोर आला. यावेळी सर्वांना एकच धक्का बसला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामुळे त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला होता.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नागपूरमधील बाजारगाव येथील सोलार कंपनीत भीषण स्फोट झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता हा प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामुळे काम करताना काळजी घेणे गरजेचे आहे.