काटा काढणारच! प्रफुल पटेलांना धडा शिकवण्यासाठी पवारांनी आखला खास गेम प्लान; केली मोठी घोषणा

अजित पवारांनी बंड केल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांसोबत आहे तर दुसरा गट अजित पवारांसोबत आहे. अनेक आमदार हे अजित पवारांसोबत गेले आहे. त्यामुळे शरद पवार आता पक्षबांधणीची तयारी करत आहे.

प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेत्यांनीही अजित पवारांना साथ दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार मैदानात उतरले आहे. बंडानंतर शरद पवारांनी राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा केली होती.

छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नाशिकमधील येवल्यात त्यांनी पहिली सभा घेतली होती. आता त्यांनी आपला मोर्चा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वळवला आहे. गोंदियामध्ये २८ जुलैला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होणार आहे.

शरद पवार यांच्या गटातील कोणकोणते नेते या मेळाव्यात उपस्थित राहणार आहे हे अजूनही निश्चित झालेले नाही. सध्या गोंदियामध्ये शरद पवार यांच्या गटाचे नेतृत्व वीरेंद्र जयस्वाल करत आहे. गोंदिया हा प्रफुल्ल पटेलांचा बालेकिल्ला आहे.

शरद पवारांचा मेळावा होत असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष हे गोंदिया जिल्ह्याकडे आहे. या जिल्ह्यातून शरद पवारांना कोण पाठिंबा देणार असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. वीरेंद्र जयस्वाल यांनी सुरुवातीला अजित पवारांना पाठिंबा दिला होता. पण आता ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटाकडे आले आहे.

शरद पवारांनी वीरेंद्र जयस्वाल यांच्याकडे त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. रवींद्र जयस्वाल यांचे शरद पवारांच्या गटात जाणे हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असल्याचेही म्हटले जात आहे. आता सर्वांचे लक्ष हे २८ जूलैला होणाऱ्या मेळाव्याकडे असणार आहे.