Rohit Sharma : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून मालिका ड्रॉ केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला हा केपटाऊनमध्ये पहिला विजय मिळाला. या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा डीआरएस घेण्याचा विचार करताना शिवी देत आहे. त्यावर विराट कोहलीने उत्तर दिले, तर त्यावेळी गोलंदाजी करणारा मोहम्मद सिराज नुसताच पाहत राहिला.
केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजी करत अhttps://www.lokmat.com/cricket/news/ind-vs-sa-2nd-test-rohit-sharma-virat-kohli-caught-abusing-while-drs-discussion-during-second-test-a-a593/सताना मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. सिराजचा एक चेंडू फलंदाजाला चकमा देऊन त्याच्या पॅडला लागला. त्यानंतर खेळाडूंनी अपील केले. परंतु अंपायरने नाबादचा इशारा दिला. त्यानंतर भारतीय संघाला डीआरएस घ्यायचा होता.
सिराजने रोहित शर्माला विचारले तेव्हा त्याने शिवी दिली आणि घेऊ 3-3 रिव्ह्यू बाकी आहेत असे म्हणाला. त्यावर विराट कोहलीने घेऊन टाक म्हणत त्याला उत्तर दिले. रोहित शर्माने शिवी दिली आणि डीआरएस घेण्याबाबत होकार दर्शवला तेव्हा विराट कोहलीनेही त्याला पाठिंबा दिला.
कोहली म्हणाला, “हो, घेऊन टाक, कदाचित इनसाईड एज लागला असेल.” दोघांचे हे संभाषण आणि रोहित शर्माला शिवी देताना पाहून मोहम्मद सिराजला हसू आलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रोहित शर्माने स्टंप माईकमध्ये शिवी दिली ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक रोहित शर्माच्या शिवीवर टीका करत आहेत, तर काही लोक त्याला पाठिंबा देत आहेत. एकीकडे रोहित शर्माचा क्रीडा कौशल्य आणि नेतृत्व कौशल्य कौतुकास्पद आहे. दुसरीकडे, स्टंप माईकमध्ये शिवी देणे हे योग्य नाही, असे काही लोकांचे म्हणणे आहे.