बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिनेश कार्तिक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा फलंदाजी सल्लागार बनला आहे. दिनेश कार्तिक ‘भारत अ’ विरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंड लायन्सचा फलंदाजी सल्लागार बनला आहे.
यामुळे याची चर्चा सुरू आहे. त्याचा कार्यकाळ 10 जानेवारी ते 18 जानेवारी असेल. माजी इंग्लिश फलंदाज इयान बेल हे जानेवारीच्या मध्यापासून कार्तिकच्या जागी फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहतील.
तसेच ग्रॅमी स्वान संपूर्ण दौऱ्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल. बेल आणि स्वान हे 2012 मध्ये भारताला एका कसोटी सामन्यात पराभूत करणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग होते. भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात १२ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत चार सराव सामने खेळवले जाणार आहेत.
अहमदाबादमध्ये १२ आणि १३ जानेवारीला दोन दिवसीय सराव सामने होईल. नंतर १७ जानेवारीपासून तीन चार दिवसीय सामने होतील. यामुळे या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये अनेक नवीन खेळाडू देखील असणार आहेत.
भारतासाठी 26 कसोटी, 94 एकदिवसीय आणि 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या दिनेश कार्तिकने 2022 विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 2004 मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते.
सध्या तो टीव्हीवर समालोचक म्हणून दिसत आहे. आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये अशाप्रकारे प्रशिक्षण देण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव असेल. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याने भारतासाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत.