‘या’ व्यक्तीसोबत लिव्हइन मध्ये राहते अभिनेत्री रेखा; अखेर स्वतःच सांगीतले आजवर लपवलेले सत्य

रेखा ही बॉलिवूडमधील सुंदर आणि सक्षम अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने इंडस्ट्रीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. याशिवाय ती तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठीही ओळखली जाते. पण, अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात सापडले आहे. अफेअरपासून लग्नापर्यंत… रेखाच्या आयुष्यात अनेक गुपिते आहेत.

अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अफेअरचे किस्से आजही मोठ्या आवडीने ऐकले जातात. अभिनेत्रीबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली गेली की तिची सेक्रेटरी फरजानासोबत तिचे खूप जवळचे नाते आहे. एवढेच नाही तर त्यांच्या चरित्रातही असा दावा करण्यात आला आहे.

काही काळापूर्वी अभिनेत्रीच्या बायोग्राफीवरून समोर आले होते की ती तिच्या सेक्रेटरीसोबत लिव्ह-इनमध्ये राहते. रेखाच्या सेक्रेटरीचे नाव फरजाना आहे, जी रेखासोबत सावलीसारखी कायम राहते. फरजाना नेहमीच प्रत्येक कार्यक्रम, पार्टी आणि फंक्शनमध्ये अभिनेत्रीसोबत दिसते.

रिपोर्ट्सनुसार, फरजाना पूर्वी रेखाची हेअर ड्रेसर होती. या कामासाठी ती अभिनेत्रीशी जोडल्या गेली होती, पण हळूहळू त्यांचे नाते घट्ट होत गेले. यानंतर रेखाने हेअर ड्रेसरपासून आपली सेक्रेटरी बनवली. कोणाला रेखाला भेटायचे असेल तर आधी फरझानाची परवानगी घ्यावी लागते, असे म्हटले जाते.

रेखा आणि फरजाना यांच्या नात्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, रेखाच्या मेहुण्याने एकदा त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते की, त्यांचे नाते पती-पत्नीसारखे आहे. त्याचबरोबर यासिर उस्मान यांनी लिहिलेल्या रेखाच्या जीवनचरित्रात अभिनेत्री फरजानासोबत गेल्या तीस वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

यासिर उस्मानच्या 2016 साली आलेल्या पुस्तकात असाही दावा करण्यात आला होता की, रेखाच्या बेडरूममध्ये फक्त फरझानालाच प्रवेश देण्यात आला होता. तिचे लव्ह लाईफ, लग्न आणि पतीशी संबंधित अनेक खुलासे या पुस्तकात करण्यात आले आहेत. आजकाल रेखा अभिनयापासून दूर आहे, पण रिअॅलिटी शो आणि पार्ट्यांमध्ये तिच्या सौंदर्याने प्रसिद्धी मिळवत आहे.