जळगाव शहरातील जैन हिल्स गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रभू श्री रामचंद्र आणि रामायणावर भाष्य केले आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ते म्हणाले, राम शाकाहारी होता की मांसाहारी होता, हे वाचूनच लक्षात येतं. त्यामुळे टीव्ही, भाषण या माध्यमातून सत्य कळणार. वेगवेगळ्या लिखित रामायणामध्ये राम सुद्धा वेगवेगळा आहे. कंबोडियातला राम वेगळा आहे, जैन रामायणातला राम वेगळा आहे, तसेच काही ठिकाणी सीता ही रामाची बहीण आहे.
तर ठिकाणी सीता ही रावणाची मुलगी आहे, अशा पद्धतीने अनेक युगांमधून बदलून वाल्मिकीच्या काळातले रामायण आपण वाचतो. यामुळे केवळ वाल्मिकींचा राम खरा कसा मानायचा? असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केला आहे.
यामुळे आता त्याच्या या वक्तव्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमात पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र नेमाडे उपस्थित होते. तसेच इतर कवी लेखर देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, साहित्यिकांनी नुसतेच लेखक म्हणून नव्हे तर त्यांनी नाविन्य शोधून समाजात ‘टुल किट’ सारखे काम करावे. मी जसा आहे तसंच व्यक्त व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. अनन्यसाधारण, युनिकपणा लेखकात असावा अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, भालचंद्र नेमाडे यांनी प्रभू राम आणि रामायणाचं उदाहरणं दिलं. राम हा शाकाहारी होता का मांसाहारी होता यावर चर्चा कशाला हवी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.