दिल्ली पोलीस दलातील सहायक आयुक्त यशपाल सिंह यांचा मुलगा लक्ष्य चौहानची त्याच्या मित्रांनी पैशांच्या वादातून हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत असून हरयाणाच्या कालव्यात लक्ष्यचा मृतदेह सापडला.
या घटनेमागे धक्कादायक माहिती समोर येत आहे. विकास भारद्वाज आणि अभिषेक यांनी लक्ष्यला कालव्यात ढकलले होते. त्या दोघांनी लग्न सोहळ्याला जायचंय असं सांगून दोघे त्याला सोनीपतला घेऊन गेले होते. तेव्हा त्यांनी त्याला मारायचा कट रचला.
लक्ष्य चौहान, विकास भारद्वाज आणि अभिषेक सोनीपतला एका लग्नासाठी निघाले होते. नंतर लक्ष्य घरी न परतल्याने त्याचे वडील एसीपी यशपाल सिंह यांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. यानंतर त्याचा तपास सुरू झाला. पोलिसांनी यंत्रणा उभी करून तपास सुरू केला.
लक्ष्य आणि विकास यांच्यात पैशांवरुन वाद वाढला होता, असे पोलिसांना समजले. यामुळे लक्ष्यच्या हत्येचा कट रचला गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लक्ष्य चौहानने आपल्याकडून कर्ज घेतले होते आणि त्याची परतफेड करण्यास तो सातत्याने नकार देत होता, अशीही माहिती समोर आली.
आरोपींच्या अटकेसाठी आठवडाभर सर्च ऑपरेशन सुरू होते. यानंतर अभिषेक आणि विकासला अटक करण्यात आली. त्याच्या माहितीमुळे सगळेच हादरले होते. लग्नाला जाण्याठी तिघे मध्यरात्री निघाले होते. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ते मुनक कालव्याजवळ थांबले. मात्र त्याच्या डोक्यात वेगळंच सुरू होतं.
नंतर विकास आणि अभिषेकने लक्ष्य चौहानला धक्का दिला. तो कालव्यात पडला. त्यानंतर दोघे घटनास्थळावरुन पळून गेले. पोलिसांनी अभिषेकला अटक केली. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विकासचा शोध सध्या सुरू आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.