शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातील बैठकीतून मोठी बातमी आली समोर

राज्यात सध्या राजकारणात रोज अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, काल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात गेले असे असताना आता शरद पवार मोठा धमाका करण्याच्या तयारी आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत महत्वाची बैठक सुरू झाली आहे.

अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिल्यामुळे शरद पवार नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत, असे बोलले जात आहे. शरद पवार गटाकडून मात्र याबाबतचा दुजोरा देण्यात आलेला नाही.

पवार यांना काँग्रेसचे नेते मंगळवारी भेटले होते. त्यानंतर आज शरद पवार यांनी आपल्या गटातील सर्व नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये ही चर्चा सुरू झाली आहे. जर अस काय झालं तर याच मोठा परिणाम राज्याच्या राजकारणात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीनंतर शरद पवार मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाती बैठक बोलवली आहे. शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत.

या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.