काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यामुळे काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये गेला.
अशातच अशोक चव्हाण यांच्यानंतर नांदेडमधील तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
काँग्रेसच्या तब्बल 55 माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाला लागलेली गळती काँग्रेसला थांबवता येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. भाजप प्रवेश आणि राज्यसभेवर निवड लागल्यानंतर काल अशोक चव्हाण पहिल्यांदाच नांदेडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत कोण कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केल्याचे पाहायल मिळाले. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत मोठ्या दणक्यात स्वागत केल्याचे पाहून अशोक चव्हाणही भावूक झाले होते.
नांदेडमध्ये एन्ट्री करतानाच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. नांदेडमधील ५५ नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. स्वतः चव्हाण यांनी ट्वीट करत या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे.
दरम्यान, नांदेड महापालिकेच्या मागील निवडणुकीत निवडून आलेल्या ८१ पैकी ७३ नगरसेवक हे काँग्रेसचे होते आणि यापैकी 55 माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे.