देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप लोकसभेच्या ३२ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे.
असे असले तरी काही जागांवरती शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. भाजपने 32 जणांची यादी अंतिम केल्याची माहिती दिली आहे. पुणे : मुरलीधर मोहोळ. धुळे : सुभाष भांबरे यांच्या ऐवजी प्रदिप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.
नांदेड : मिनल खतगावकर, जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवल जाण्याची शक्यता. नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.
अकोला : संजय धोत्रे ईशान्य मुंबई : मनोज कोटक सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्या ऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता. कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे. भंडारा- गोंदिया : सुनिल मेंढे, बीड : विद्यामन प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे.
माढा – रणजितसिंह निंबाळकर, गडचिरोली : अशोक नेते यांच्या ऐवजी राष्ट्रवादी चे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपा चिन्हावर लढू शकतात. भिवंडी : कपिल पाटील, सांगली : संजय काका पाटील यांच्या ऐवजी काँग्रेसचे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतात.
सातारा : उदयनराजे भोसले, दिंडोरी : भारती पवार, रावेर : अमोल जावळे उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजपा पक्ष प्रवेश केलाय) उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.
संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड. उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्या ऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता. ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. मात्र भाजपा घेण्यास आग्रही आहे.)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.( रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अजूनही वाद सुरू आहे. शिंदे गटाकडून किरण सामांत लढण्यास इच्छुक आहेत.) दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर ( दक्षिण मध्यदक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश देऊन राज्यसभा दिली.)
राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत. मात्र ते भाजपा पक्षप्रवेश करून भाजपा तिकिटावर लढतील अशी शक्यता आहे. अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे. सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे. अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्ष प्रवेश होईल. मात्र नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत.
या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही आहेत. हिंगोली – हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजप आग्रही असून त्याठिकाणी भाजपा तानाजी मुरकुटे यांना मिळण्याची शक्यता आहे. ऐनवेळी जागांमध्ये बदल होऊ शकतो.