अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांचा केला कार्यक्रम? मुंबईत 6 जागांपैकी 5 जागा भाजप लढवणार, शिंदेंना धक्का…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते हे पक्ष देखील बदलत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

लोकसभा निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून भाजपची यादी तयार झाली असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती आहे. यामध्ये मुंबईत 6 जागांपैकी तब्बल 5 जागा या भाजप लढवणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना कमी जागांवर राजी करण्याचा प्रयत्न केला होता.

अधिक तिकीटं हवी असल्यास सेनेच्या खासदारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरल्याचंही बोललं जातं. शिंदेंना शाहांचे मन वळवण्याला मोठे यश आल्याचे मानले जात आहे. यामुळे आता शिंदेच्या गटात नाराजी पसरणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, सुरुवातीला मुंबईत शाहांसोबत झालेल्या बैठकीत शिंदे यांनी १८ जागांची मागणी केली होती. शिवसेनेने २०१९ मध्ये जिंकलेल्या जागांचा यात समावेश होता. नंतर ते १५ वर आले. शहा यांनी शेवटी नकार दिला आणि दिल्लीतील बैठकीत १३ जागांवर सहमती दर्शवली असल्याची माहिती आहे.

आता काही जागांवर उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. भाजप धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची माहिती देखील पुढे येत आहे. महाराष्ट्रातील एकूण १२ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामुळे आता या नेत्यांचे टेन्शन वाढले आहे.