Solapur LokSabha : सोलापूरमध्ये राम सातपुतेंचा पत्ता कट? भाजपकडून अचानक ‘हे’ नाव निश्चित…

Solapur LokSabha : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. यामध्ये त्यांनी दोन याद्या देखील जाहीर केल्या आहेत. असे असताना राहिलेल्या जागांवर इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. भाजपने दुसरी यादी जाहीर केली अन् राज्यातील 20 जागेवर उमेदवार निश्चित झाले.

एकीकडे माढाच्या जागेवरून वाद सुरू असताना सोलापूरात देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूरच्या जागेवर राम सातपुते यांना जागा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र त्यांचे नाव आता मागे पडले आहे.

याठिकाणी आता भाजपकडून पद्मश्री आणि उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मिलिंद कांबळे हे प्रणिती शिंदे यांच्याविरोधात रणशिंग फुकणार असल्याचे जवळजवळ निश्चित झालं आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी सोलापूरमधून मी लोकसभा लढवणार आहे. माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे. काही दिवसांत माझी उमेदवारी जाहीर होईल, असे स्वत: प्रणिती शिंदे यांनी सांगितले होतं. यामुळे प्रणिती शिंदे विरुद्ध मिलिंद कांबळे यांच्यात थेट मुकबला होणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

दरम्यान, मिलिंद कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचा चांगला जनसंपर्क देखील आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर देण्यासाठी उच्चशिक्षित चेहरा भाजपकडून मिलिंद कांबळे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुढील यादीत त्यांचे नाव असेल असेही सांगितले जात आहे.