श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंनी आखली रणनीती, तगडा उमेदवार देऊन देणार धक्का? आतली महिती आली समोर…

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेकांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवाराचा शोध कायम आहे. या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याठिकाणी उमेदवार मिळत नसल्याची चर्चा असून त्यामुळे उमेदवार आयात करावा लागण्याची शक्यता आहे. कल्याणसाठी ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांच्यासह सुषमा अंधारे यांची नावे चर्चेत होती. नंतर मात्र ही नावे मागे पडली. आता ठाण्यातील केदार दिघे यांचे नाव चर्चेत आहे.

दरम्यान, याबाबत माहिती अशी की, स्थानिक भूमीपुत्रांचा पाठिंबा आणि ठाणे, रायगड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर प्रभुत्व असलेले काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांना ठाकरे गटाकडून ऑफर आली असल्याची माहिती दिली. यामुळे ते हाताच्या पंजावर ठाम राहतात की हातात मशाल घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करतात हे आता पहावे लागेल.

हा मतदारसंघ शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. महायुतीने अद्याप येथील आपला उमेदवार घोषित केला नाही. असे असताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावे प्रचार करण्यास महायुतीने सुरुवात केली आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या मतदार संघात रश्मी ठाकरे यांचे माहेर आहे. त्यामुळे येथून कौटुंबिक पाठिंबा मिळेल. रश्मी ठाकरे यांना प्रचारात प्रत्यक्ष उतरवता येईल आणि मतांचे ध्रुवीकरण करता येईल, अशी रणनीती ठाकरे गटाच्या वतीने आखण्यात येत होती. मात्र अजून उमेदवार निश्चित झाला नाही.

ददरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला आहे. यामुळे याठिकाणी सुरुंग लावण्याचा आणि एकनाथ शिंदे यांना याठिकाणीच अडकवून ठेवण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न असणार आहे. यामुळे या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.