हार्दिकला चिडवू नका रे! रोहितनं चाहत्यांना केली विनंती, मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

सध्या आयपीएलला सुरुवात झाली असून चाहते आपल्या टीमला सपोर्ट करत आहेत. आता आयपीएल सुरूवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्समध्ये अनेक बदल झाल्याचे दिसून आले. यामध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला सोडून हार्दिक पंड्याकडे टीमची कॅप्टन्सी सोपवली. यामुळे चाहते नाराज झाले.

हा निर्णय चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. यावेळी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांमध्येही पुरेसा आपलेपणा दिसून आला नाही. मुंबईच्या टीममध्ये दोन गट पडल्याचे म्हटले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमची सुरुवात देखील चांगली झाली नाही.

हार्दिक पांड्या सध्या मुंबई क्रिकेट फॅन्सच्या निशाण्यावर आहे. तो जाईल तिथे त्याला ट्रोल केले जात आहे. वानखेडे स्टेडियममध्ये देखील असाच प्रकार पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

या व्हिडीओमध्ये तो प्रेक्षकांकडे पाहून काहीतरी इशारा करताना दिसत आहे. हा इशारा त्याने हार्दिकचे ट्रोलिंग थांबवण्यासाठी केला होता, असे काहींनी म्हटले आहे. तर काहींच्या मते त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, संपूर्ण मॅच दरम्यान रोहितच्या नावाचाच जयघोष केला जात होता. या व्हिडीओमधील रोहितने पाठिमागे प्रेक्षकांकडे पाहून हात जोडले आणि थोडं शांत व्हा असा इशारा केला. यामुळे याबाबत त्याचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान, हार्दिकची रणनीती सपशेल अपयशी ठरताना दिसतेय. मुंबईच्या टीमने यावेळी सलग दोन सामने गमावले आहेत. यामुळे वरिष्ठ त्याच्यावर नाराज असल्याची देखील माहिती समोर आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात टीम मध्ये बदल होऊ शकतो.