‘ती’ खेळी आपल्याच अंगलट येताच बारामतीत नवीन डाव, अजित पवारांची मोठी खेळी, जाणून घ्या..

बारामती लोकसभा निवडणुकीत सध्या मोठ्या प्रमाणावर सभांचा धडाका सुरू आहे. यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी पवार कुटूंबातच हा सामना होत आहे. असे असताना आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी या मतदार संघात जातीने लक्ष घातले आहे.

बारामती माझं घर आहे. आतापर्यंत आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. अनेक निवडणुका लढवल्या आहेत. समोरचा उमेदवार तुल्यबळ असल्याचे समजूनच मी कायम निवडणुकांसाठी रणनीती आखत असतो, असे अजित पवारांनी म्हटले आहे. आता काहीसा सूर या प्रचारात बदलला आहे.

याबाबत अजित पवार म्हणाले की, बारामतीची लढाई गावकीभावकीची नाही. देशाचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा, नरेंद्र मोदींच्या की राहुल गांधींच्या? याचा निर्णय मतदारांना घ्यायचा आहे. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची ‘लाईन’ घेतली आहे. यामुळे याची चर्चा रंगू लागली आहे.

ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी करण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्या पाठोपाठ आता अजित पवारही करू लागले आहेत. शरद पवारांना संपवण्यासाठी सगळे एकत्र आले आहेत, असं म्हणत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे भाजपवर तुटून पडल्या. त्याचा फायदा सहानुभूतीच्या रुपात पवारांना होताना दिसला.

यामुळे हेच ओळखून आता ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी असल्याचं सांगू लागले. आता तशीच भूमिका अजित पवारांनी घेतली आहे.ते म्हणाले, केंद्रात राहुल गांधी हवेत की नरेंद्र मोदी याचा निर्णय मतदारांना घ्यायचा आहे. यामुळे देशात मोठे निर्णय होणार आहेत.

तसेच आम्ही मागील १० वर्षे विरोधात होतो. त्यामुळे रेल्वे, विमानतळं, विमानतळांची टर्मिनल्स यासाठी म्हणावा तसा पैसा आला नाही. त्यामुळे लोकांनी भावनिक होऊ नये. मी माझ्या सगळ्या सभांमध्ये हेच सांगतोय, असेही अजित पवार म्हणाले.