सुरतला जाताना उद्धव ठाकरेंचा फोन आला अन्…; एकनाथ शिंदे यांनी सगळंच सांगून टाकलं…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे आहे. बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, आई त्यांनी म्हटले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

माझा फोन झाल्यानंतर ठाकरेंनी भाजपशी देखील बोलणी सुरु केली होती. असा एकही दिवस नव्हता जेव्हा माझा अपमान व्हायचा नाही. हा कोणता कट नव्हता कर उठाव होता. राज्यसभेच्या निवडणुकीवेळीच तो सुरु झाला होता, असा महत्वाचा खुलासा त्यांनी केला आहे.

तसेच संजय राऊत यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत मी माझ्या आमदारांना संजय राऊतांना मतदान करण्यास सांगितले होते. त्यांचा पराभव करु शकलो असतो पण केला नाही. मतदान करून आम्ही सुरतला निघालो.

यावेळी उद्धव ठाकरेंचा मला अनेकदा फोन आला. मी वसईमध्ये असताना एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो. यावेळी उद्धव ठाकरेंचा फोन आला. मला त्यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला आहे. मात्र मी म्हणालो आता खूप उशीर झाला आहे.

दरम्यान, माझा नेहमी अपमान झाला. माझे मंत्रीपद काढून घेण्याचा प्रयत्न होता. जीवाला धोका असून देखील माझी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली नाही. त्यांना स्वत:ला आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे होते. मात्र मी मधी येईल असं त्यांना वाटत होतं.

मला मुंबईमध्ये देखील लक्ष घालू दिले नाही. तसेच महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचे शरद पवारांनी सूचवले नाही. पवारांकडे काही माणसं पाठवण्यात आली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा केली.

मला मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरु होती. माझी सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. पण, पुढे ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवले, आम्ही कधी गद्दारी केली नाही. आमच्यावर अन्याय झाल्याचे देखील शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.