लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे. यामध्ये अनेक कलाकार मोठे झाले त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. यामध्ये फिल्टर पाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला अभिनेता गौरव मोरे देखील प्रसिद्ध झाला. आता त्याने एक मोठी घोषणा केली आहे.
अभिनेता गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला कायमच रामराम केला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे.
यात सगळी टीम आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. रसिक प्रेक्षक आपण सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रा मधुन आपला निरोप घेत आहे, अशी पोस्ट त्याने केली आहे.
तसेच तो पुढे म्हणाला, माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो. असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा.
तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे, असे गौरव मोरेने या पोस्टमध्ये म्हटले आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांनी तुला खूप खूप शुभेच्छा, भविष्यात पुन्हा कधीतरी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसोबत काम करताना भेटू, असेही अनेकांनी म्हटले आहे.
दरम्यान, अनेकांनी तो सोडून गेल्यामुळे दुःख व्यक्त केले आहे, तसेच काहींनी त्याला पुढील नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यामुळे आता त्याची नवीन भूमिका कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.