देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळपास पूर्ण झाले असून आता सगळे 4 जूनच्या निकालाची वाट बघत आहेत. या निकालाच्या दिवसाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातले पाच टप्पे संपल्याने आता निकालाच्या दृष्टीने तयारी करण्यात येते आहे. असे असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपावर धक्कादायक आरोप केला आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम यंत्रणा स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आली आहे. तेथे २४ तास सुरक्षा दलांचा बंदोबस्तही तैनात आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी हे कॅमेरे बंद पडल्याच्या बातम्या आल्या होत्या.
दरम्यान, आता जळगाव येथे वखार महामंडळाच्या गोदामात ही स्ट्राँग रुम तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही डिस्प्ले चार मिनिटं बंद झाला होता ज्यावरुन आरोप सुरु झाले आहे. यामुळे उन्मेष पाटील यांनी ईव्हीएम वरुन भाजपावर आरोप केला आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत ते म्हणाले, भाजपाचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी स्ट्राँग रुममध्ये फिरत आहेत. जनरेटर बॅक अप घेताना सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होणं ही बाब संशयास्पद आहे. त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं आहे.
सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होण्यामागे जे लोक कारणीभूत आहेत अशांवर कारवाई केली गेली पाहिजे असेही उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे, बारामती, सातारा, शिरूर याठिकाणी देखील सीसीटीव्ही बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात या निकालावर सगळं गणित अवलंबून आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक नेते पक्ष यामध्ये फुटाफुटी झाल्यामुळे ही निवडणूक चर्चेची झाली आहे.