हक्काच्या राज्यात भाजपला धक्का बसणार, C-व्होटरचा मोठा अंदाज, थेट निकालाच सांगितला…

सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. यामुळे सध्या याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 4 रोजी आहे. भाजपसाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे. तसेच विरोधकांसाठी देखील महत्वाची आहे.

सध्या निकालाचा अंदाज आणि एक्झिट पोलबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये C-Voter चे संस्थापक यशवंत देशमुख यांनी मोठं भाकीत केलं आहे. यामुळे नेमकं ते काय म्हणाले याचीच चर्चा सुरू आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत धक्कादायक भाकित वर्तवले आहे.

यामुळे भाजपच्या 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे स्वप्न भंग होऊ शकते, असा अंदाज आहे. महाराष्ट्र देखील त्यांच्या जागा कमी होतील असेही सांगितले जात आहे. यशवंत देशमुख यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजप, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष आणि काँग्रेची कामगिरी कशी असेल यावर वक्तव्य केले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने जवळपास कोणत्याही विद्यमान खासदाराचे तिकिट कापले नाही. आणि हीच भाजपसाठी मोठी समस्या आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपचा खेळ बिघडू शकतो. याठिकाणी त्यांच्या जागा यामुळेच कमी होतील असेही सांगितले जात आहे.

दरम्यान, मायावती यांच्या बसपने कितीही वाईट कामगिरी करू द्या, तरीही त्यांना काँग्रेसपेक्षा जास्त मते पडतील. भाजपने उत्तर प्रदेशात ज्या विद्यमान खासदारांना तिकिटे दिली आहेत, ते खासदार खूपच अलोकप्रिय आहेत. यामुळे याठिकाणी मोठी गडबड होऊ शकते, अशीही शक्यता नाकारता येत नाही.

उत्तर प्रदेशातील ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर होत असल्याने बहुतांश जागांवर काट्याची टक्कर होणार आहे. आतापर्यंत सहा टप्प्यामध्ये मतदान पार पडले असून, एक जूनला शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 4 जूनला सगळं चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा विजय मिळवणार की काँग्रेसच्या नेतृत्त्ववाखालील आघाडीचा दहा वर्षांचा वनवास संपणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या राज्यात सर्वात जास्त जागा आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी केली होती.