मोदींच्या हातून जाणार हुकमी एक्का? भाजपला मोठा धक्का? आतली माहिती आली समोर…

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. यामुळे त्यांच्या जागा कमी झाल्या. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या ६० पेक्षा जास्त जागा देशभरात कमी झाल्या. यामुळे आता भाजपला एकहाती सत्ता स्थापन करण्यात येणार नाही.

त्यांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा धडाकाच लावला होता. एनडीए ४०० पर्यंत जाईल असा दावा अमित शाह यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात एनडीएचे ३०० उमेदवारही निवडून आले नाहीत. अनेक मंत्री देखील यामध्ये पराभूत झाले आहेत.

आता लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी वेगानं हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच काँग्रेसनेही यंदा आपली कामगिरी सुधारली आहे. तरीही इंडिया आघाडीला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. हा आकडा गाठण्यासाठी त्यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा पाठिंबा हवा आहे.

सध्या हे दोन्ही नेते एनडीएच्या समर्थनात आहेत. यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार हे सर्वात मोठे किंगमेकर असल्याचं सांगितलं, त्याचवेळी खर्गे यांनी हे वक्तव्य केल्याने नितीश कुमार हे एनडीएचा गेम करणार की काय अशी चर्चा आहे. यामुळे नेमकं काय होणार हे दोन दिवसात समोर येईल.

तेजस्वी यादव यांच्यामते नितीश कुमार एकमेव असे नेते आहेत जे बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देऊ शकतात. यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. दरम्यान, नितीश कुमार यांना थेट इंडिया आघाडीत सामील होण्याची ऑफर देण्यात आली आहे. इतकंच नाही तर इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना उपपंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. यामुळे पुढील काही दिवस महत्वाचे असणार आहेत.

जेडीयूने ते अजूनही एनडीएसोबत असल्याचे सांगितले आहे. नितीश कुमार एनडीएसोबतच राहणार असल्याचे केसी त्यागी यांनी सांगितले आहे. एनडीएची बैठकही पार पडली. यानंतर नितीश कुमार म्हणाले की लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं, जास्त काळ थांबून राहू नये.

यावेळी जेडीयूने भाजपकडे सभापतीपदाची मागणी केल्याचंही सांगितलं जात आहे. दुसरीकडे टीडीपीचाही त्या पदावर डोळा असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे येणारा काळ हा एनडीएसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कोणाला किती मंत्रीपदे मिळणार हे देखील बघणे महत्वाचं असणार आहे.