नुकतेच देशात नवीन सरकार स्थापन झाले असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली आहे. बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामुळे कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नरेंद्र मोदी यांच्यासहित ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला. यामध्ये अनेक मंत्री विद्यमान खासदार यांचा देखील समावेश आहे. असे असले तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मात्र वियजी झाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. असे असताना लोकसभेची जागा जिंकूनही नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यामुळे याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. नारायणे राणेंना भाजपच्या कोट्यातून राज्यसभा मिळाली. त्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात अडीच वर्ष लघू, सुक्ष्म उद्योग खात्याचे मंत्रिपद त्यांना देण्यात आले होते. कोकणात भाजपला आपली ताकद उभी करण्यासाठी भाजपने त्यांना मंत्रिपद दिले होते.
यामुळे यंदाही लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर नारायण राणे यांना मंत्रिपदाची आशा होती. मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये राणे यांनी लघू,सुक्ष्म उद्योग खाते सांभाळले. मात्र त्यांना हे खाते चालवण्यात ते यशस्वी झाले नसल्याचे सांगितले जात आहे.
भाजपने राणे यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी गळ घातली. त्यानंतर यंदा राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली, यामध्ये ते जिंकून देखील आले. राणे यांनी लोकसभा जिंकूनही केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.
राणे यांच्या खात्यातून जास्त लघू उद्योजक तयार व्हावेत, असं उद्धिष्ट होते. मात्र, राणे त्यांच्या खात्यातवर फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. यामुळे त्यांना वगळण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याची जोरदार चर्चा कोकणात सुरू आहे.