बड्या हॉटेलांमध्ये तरुणींचे लैंगिक शोषण, भाजप IT सेल प्रमुखांवर RSS स्वयंसेवकाचा आरोप, घटनेने सगळेच हादरले…

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंतनु सिन्हा यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संघाचे स्वयंसेवक असलेल्या शंतनु सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वी मालवीय यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

यानंतर मालवीय यांनी सिन्हा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. यामुळे या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मालवीय यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार आहे. त्यामुळे माझ्या अशिलाच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे.

करण्यात आलेल्या आरोपांबद्दल ३ दिवसांत उत्तर द्या, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे हे प्रकरण आता चांगलंच गाजत आहे. दरम्यान, अमित मालवीय यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे हे प्रकरण याठिकाणी चांगलेच गाजत आहे.

याबाबत काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मालवीय यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी सरकार सत्तेत येऊन २४ तासही उलटले नसताना भाजप नेत्यांनी त्यांच्या कृष्णकृत्यांनी देशाची मान शरमेने खाली घालायला लावली, असे त्यांनी सांगितले आहे.

मालवीय यांच्यावर आम्ही आरोप केलेले नाहीत, ते भाजपच्याच नेत्यांनी केले आहेत, असे श्रीनेत म्हणाल्या. यामुळे आता याबाबत तपास सुरू आहे. यामुळे या प्रकरणाचा राजकीय फायदा देखील घेण्याचा प्रयत्न याठिकाणी केला जात आहे. याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, भाजपमधील पदाधिकारी राहुल सिन्हा यांचे भाऊ आणि संघाचे स्वयंसेवक असलेल्या शंतनु सिन्हा यांनी ७ जूनला फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये याबाबत सगळी माहिती देण्यात आली आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.