पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेची आढावा बैठक पुण्यात पार पडली. त्या बैठकीला भाजपचे आमदार राहुल कुलही उपस्थित होते. त्यांच्या समोर सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, अशी मागणी केली. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या बैठकीत अजित पवार यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र आता पुणे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अजित पवार यांना महायुतीतून काढा, अशी मागणी केली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांमुळे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी अजित पवार बोकांडी बसले असल्याची टीका सुदर्शन चौधरी यांनी केली आहे. अजित पवार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. विधानसभेची सत्ता नकोय, पण अजित दादांना महायुतीतून काढा, अशी मागणी सुदर्शन चौधरींनी केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात काहीही घडू शकत.
तसेच महायुतीमध्ये यामुळे सगळं काही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. यानंतर आता पुण्याच्या अजित पवार यांच्या गटाच्या रूपाली ठोंबरे पाटील चांगल्याच भडकल्याचे पाहायला मिळाले. यामुळे वातावरण तापलं आहे. अजित पवार भाजपसोबत आल्याने अनेक नेते नाराज असल्याची देखील चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील महायुतीमध्ये असतांना देखील आपण एकटे लढू असा इशारा दिला होता. यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता याबाबत केलेली वक्तव्य चर्चेत आली आहेत.
यामुळे येणाऱ्या काळात नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार गटातील प्रवक्त्याना वरिष्ठ नेत्यांचा आदेश घेतल्याशिवाय काही बोलायचं नाही, असे सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.