7 हजार रूपये पगार घेणारी मोलकरीण अचानक कमवायला लागली करोडो, सुनेला समजलं सासऱ्यांचं गुपित

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका धक्कादायक आणि विचित्र घटनेने खळबळ उडवली आहे. अलखधाम नगर येथे राहणारे एक प्रसिद्ध ज्योतिषाचार्य, त्यांच्या मुलगा आणि सूनासोबत राहत होते. त्यांच्या घरी पिंकी गुप्ता नावाची मोलकरीण गेल्या तीन वर्षांपासून 7 हजार रुपये पगारावर काम करत होती.

मात्र, अचानक तिच्याकडे करोडोंच्या वस्तू दिसू लागल्या, ज्यामुळे ज्योतिषाचार्याच्या मुलगा आणि सुनेला संशय आला. घरातील महागड्या वस्तू गायब होण्यासोबतच पिंकीच्या वागणुकीत अचानक झालेल्या बदलामुळे घरातील मंडळी सतर्क झाली. ज्योतिषाचार्याची सून पिंकीच्या फोनवर पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला.

एके दिवशी फोन तपासताना तिला धक्कादायक माहिती मिळाली. पिंकीने आपल्या प्रियकर राहुल मालवीयच्या मदतीने ज्योतिषाचार्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केले होते. त्या व्हिडिओंच्या आधारे पिंकीने ज्योतिषाचार्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यास सुरुवात केली होती.

प्रतिष्ठेचा विचार करून ज्योतिषाचार्याने ही बाब लपवून ठेवली होती. पिंकीने आतापर्यंत ज्योतिषाचार्याकडून तब्बल चार कोटी रुपये उकळले होते. तिच्या या कृत्यामुळे मुलगा आणि सुनेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

नीलगंगा पोलीस स्टेशनने या प्रकरणी पिंकी गुप्ता, तिची बहीण आणि आईला अटक केली आहे, तर पिंकीचा प्रियकर फरार आहे. पोलिसांनी पिंकीच्या घरातून सुमारे 45 लाख रुपये आणि 55 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.