---Advertisement---

Immoral relationship : अनैतिक संबंधातून मुलाचा जन्म, ६ महिन्यांनंतर बापाने केलं असं काही केलं की पाहून सगळेच हादरले…

---Advertisement---

Immoral relationship : बदनामीच्या भीतीने सहा महिन्याच्या बाळाचा गळा आवळून त्याचा जीव घेतला. मृतदेह विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पुणे पोलिसांनी सखोल तपास करून थेट आर्णी गाठलं.

आरोपी पित्यासह, बाळाची आई आणि आजी यांना मंगळवारी ताब्यात घेतले. संदीप बळीराम राठोड (वय २१, रा. सेवानगर, आर्णी) असे आरोपी पित्याचे नाव आहे. संदीप हा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे एका कारखान्यात काम करीत होता. त्याचे मेहुणीसोबत अनैतिक संबंध होते.

तिच्यासोबत तो रांजणगाव येथे एका खोलीत राहत होता. मेहुणी अल्पवयीन असल्याने त्यांचा विवाह झाला नाही. पण, त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाल्याने मुलगा झाला. मुलगा सहा महिन्यांचा झाल्यावर समाजात बदनामी होईल, या भीतीने मुलाला ठार मारण्याचा निर्णय संदीपने घेतला.

त्याला मेहुणीने विरोध केला. पण, संदीपने ९ नोव्हेंबरला मुलाला मारले आणि मेहुणीसह तो आर्णी येथे परतला. रांजणगाव पोलिसांना विहिरीत बाळाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी प्रसूती झालेल्यांची माहिती जमा केली.

संदीप राठोड याचे घर बंद दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी आर्णीचे ठाणेदार केशव ठाकरे यांना माहिती दिली. ठाकरे यांनी आरोपींना ताब्यात घेतले. सायंकाळी रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---