Uttar Pradesh : प्रख्यात डॉक्टरसोबत घडलं भयंकर; लेकीला सोडवायला स्टेशनवर गेले अन् क्षणात मुंडक धडावेगळं, घटनेचा VIDEO व्हायरल

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.लखन सिंग गालव यांचा रेल्वेत पाय अडकून मृत्यू झाला. ते आपल्या मुलीला राजा की मंडी स्टेशनवर सोडण्यासाठी आले होते.

ट्रेन सुरू झाल्यावर मुलीला बसवून ते ट्रेनमधून खाली उतरत होते. त्यांचा पाय लटपटले आणि ते खाली पडले. आग्रा येथील गलाना रोडवर राहणारे लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. लखन सिंग गालव यांची दुसरी मुलगी केजीएमयू, लखनऊ येथून एमबीबीएस करत आहे.

5 नोव्हेंबर रोजी सकाळी डॉ. गालव आपल्या मुलीला महाकौशल एक्स्प्रेसमध्ये बसवण्यासाठी राजा की मंडी स्टेशनवर पोहोचले. ट्रेन राजा की मंडी स्टेशनच्या मागील प्लॅटफॉर्मवर येणार होती. महाकौशल एक्सप्रेस राजा की मंडी स्थानकात पोहोचली.

\त्यांनी आपल्या मुलीला एसी कोचमध्ये बसवले. दोन मिनिटे ट्रेनचा थांबा होता, या दरम्यान ट्रेन पुढे जाऊ लागली. दरम्यान, डॉ.गालव ट्रेनच्या दरवाजावर आले. ते ट्रेनमधून खाली उतरणार तेच त्यांचा पाय ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला आणि ट्रेन पुढे जाऊ लागली.

यावेळी स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकांनी गोंधळ घातला मात्र तोपर्यंत ट्रेन सुरू झाली होती. रेल्वेत पाय अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महाकौशल एक्सप्रेस राजा की मंडी स्थानकातून निघाली तेव्हाच मुलीला अपघाताची माहिती मिळाली.

आग्रा कॅंट स्टेशनवर ती ट्रेनमधून खाली उतरली. काही वेळातच हे कुटुंब राजा की मंडी स्टेशनवर पोहोचले. डॉ.लखन सिंग गालव हे असोपा हॉस्पिटल, पुष्पांजली हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. ते प्रॅक्टिकल होते आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये त्यांचे चांगले नाव होते.

डॉ.लखन यांच्या दुःखद मृत्यूनंतर येथील वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध न्यूरो डॉक्टर नरेश शर्मा सांगतात की, डॉ. लखन हे अतिशय नामवंत डॉक्टर होते. त्यांनी रुग्णाकडे कुटुंबातील सदस्य म्हणून पाहिले. डॉ.लखन यांचे अशा प्रकारे आपल्या सर्वांचे जाणे हे वैद्यकीय जगताचे मो