Accident News: एक शॉर्टकट जीवावर बेतला, कारने दिली दुचाकीला धडक, पती-पत्नी अक्षरशः हवेतच उडाले…

Accident News: एका पती- पत्नीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दुचाकीवरून जात असताना एका पती-पत्नीने महामार्गावरून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांना उडवले. यामुळे मोठा अपघात झाला आहे.

या अपघातात पती-पत्नी उंच हवेत उडाले. या घटनेत दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. वर्धा जिल्ह्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पवनार परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुजेट समोर आला आहे.

दुचाकीवरून जात असताना एका पती-पत्नीने महामार्गावरून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे हा अपघात झाला आहे. अवधूत वैरागडे व त्यांच्या पत्नी चित्रा हे दोघेही दुचाकीने वर्धा येथून नागपूरकडे जात होते. यावेळी हा अपघात झाला आहे.

अवधूत हे चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत महामार्गावरील दुभाजक ओलांडण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी नागपूरकडून वर्ध्याकडे जात असलेल्या कारने दुचाकीला धडक  दिली. यावेळी गाड्यांचा वेग जास्त होता. यामुळे क्षणात हा अपघात झाला.

काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अनेकदा चुकीच्या साईट वाहने चालवून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करू नका, अशा सूचनांचे फलक महामार्गावर लावलेले असतात. मात्र, अनेकजण सर्रास याकडे दुर्लक्ष करतात. अंतर कमी व्हावे म्हणून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अपघात होतात.