Accident News: माजी खासदाराच्या कारचा भीषण अपघात, पत्नीचा डोळ्यासमोर तडफडून मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

Accident News: दिल्ली- मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्या मुलाचा आणि सुनेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जसवंत सिंग यांची सून चित्रासह यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी आहे की, बारमेरचे माजी खासदार मानवेंद्र सिंह त्यांची पत्नी आणि मुलासह दिल्लीहून जयपूरला निघाले होते. यावेळी अचानक त्यांची कार डिव्हायडरला जोरात धडकली. अपघाताचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. या भीषण अपघातात त्यांच्या पत्नीला जीव गमवावा लागला आहे.

अपघातात मानवेंद्र सिंह आणि मुलगा हमीर सिंग गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. दोघांनाही अलवर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. या दरम्यान रुग्णालयात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते उपस्थित असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

मानवेंद्र सिंह आणि मुलगा हमीरची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. या अपघातात कार चालक ही गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार , हरियाणा सीमेजवळील दिल्ली मुंबई महामार्गावर अपघात झाला आहे.

दरम्यान, मानवेंद्र सिंह हे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी 1999 मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी बारमेर- जैसलमेर मतदार संघातून काँग्रेसचे कर्नल सोमनाथ राम यांच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

मानवेंद्र सिंह यांनी धीर न सोडता 2004 च्या निवडणुकीत पराभवाचा वचका काढला. कर्नल सोनाराम यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. 2013 मध्ये राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले. 2018 मध्ये माजी खासदार मानवेंद्र सिंह पत्नीसह भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले.