---Advertisement---

अभिनेता शाहरूखचा अमेरीकेत भयंकर अपघात! अख्ख तोंड रक्तबंबाळ; तातडीने करावी लागली ‘ही’ शस्रक्रिया

---Advertisement---

बॉलिवूडचा किंग खान आणि चाहत्यांच्या आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अपघात झाला, त्यानंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जाणून घेऊया शाहरुखचा अपघात कधी आणि कसा झाला.

सूत्रांनी सांगितले की, शाहरुख लॉस एंजेलिसमध्ये त्याच्या प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असताना त्याच्या नाकाला दुखापत झाली, त्यानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. दुखापत फार खोल नसली तरी. मात्र अभिनेत्याच्या अपघाताबाबत शाहरुख किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

रिपोर्टनुसार, दुखापतीमुळे शाहरुखच्या नाकातून रक्त येऊ लागले. पण चांगली गोष्ट म्हणजे दुखापत फार खोल नव्हती. अभिनेता आता त्याच्या घरी मन्नतला परतला आहे आणि तो बरा झाला आहे. असेही सांगण्यात येत आहे की शाहरुखची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या टीमला घाबरण्याचे काही नाही असे सांगितले होते.

अपघातानंतर किंग खान नाकावर पट्टी बांधलेला दिसला.शाहरुखच्या अपघाताची बातमी समोर येताच अभिनेत्याचे सर्व चाहते अस्वस्थ झाले असून ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, या अभिनेत्याने पठाण चित्रपटाद्वारे पुनरागमन केले.

या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धमाल केली. पठाणमध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला. शाहरुख खान लवकरच जवान या चित्रपटात दिसणार आहे. किंग खानचा हा चित्रपटही अॅक्शन, इमोशन्स आणि थ्रिलने परिपूर्ण असेल. हा चित्रपट यावर्षी 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अभिनेत्याचा डंकी हा चित्रपटही चर्चेत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---