पुन्हा एक हुंडाबळी! मुलीचे हातपाय बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारलं, बारामतीमध्ये धक्कादायक प्रकार

दौंड तालुक्यातील नामदेव बबन करगळ रा. गिरीम यांची मुलगी सुरेखा भाउसाहेब गडदरे हिला बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे असणाऱ्या शेततळ्यात तीच्या सासरच्या मंडळींनी तीचे हात ओढणीने बांधून तिला पाण्यात बुडवून मारले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

या घटनेमुळे मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलीच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस चौकशी सुरू केली आहे.

सुरेखा हिचा आरोपिंनी शाररीक व मानसिक छळ केला. मात्र नंतर तिला जीवे मारले गेले. तिचे पती भाउसाहेब महादेव गडदरे सासु ठकुबाई महादेव गडदरे, मासाळवाडी यांनी घराजवळ असलेल्या शेततळयामध्ये तीचे दोन्ही हात ओढणीने बांधुन तिला पाण्यात बुडवुन जीवे ठार मारले आहे.

दरम्यान, वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपिंवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोसई लवटे करीत आहेत. या प्रकरणात आशा सोनबा कोकरे आणि सोनबा चंदर कोकरे यांचाही समावेश असल्याचे म्हटले असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, लग्न होऊन तीन साडेतीन महिने झाले होते. त्यानंतर घरच्या पुजेसाठी मुलगी माहेरी आली होती. सासरी त्रास होत आहे, असे तिने आधीच सांगितले होते. तेव्हा तिच्या सासरहून दिराचा फोन आला की तिला माघारी पाठवा.

नंतर समजावून तिला परत पाठवलं मात्र नंतरही हा प्रकार सुरूच होता. आम्हांला माहित असतं मुलीला इतका त्रास होतोय तर आम्ही तडजोड केली असती, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे.