वय फक्त १९, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गमावला डेंग्युमुळे जीव; शेवटची पोस्ट वाचून ढसाढसा रडले चाहते

अवघ्या 19 व्या वर्षी बांग्लादेशीय अभिनेत्री निशत अरा अलविदा हिचे निधन झाले आहे. निशतला ४ दिवसांपूर्वी डेंग्यूचा ताप आला होता. पण वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण त्यानंतर तिने स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. यामुळे तिच्या चाहत्यांना एकच धक्का बसला.

तिच्या प्लेटलेटच्या पातळीत झपाट्याने घट होत गेली. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर एका दिवसातच या पातळीत वाढही दिसून आली. नंतर तिला घरी सोडण्यात आले होते. औषधांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असे वाटत असताना पण काळाने घात केला.

तिने शेवटच्या क्षणी फेसबुकवर पोस्ट केली होती. यात ती म्हणाली, माझ्या पुढच्या जन्मी मी पक्षी म्हणून जन्म घेईन’. निशतची ही पोस्ट बरीच व्हायरल होत आहे. दरम्यान निशतने आपला रुग्णालायातील बेडवरून एक फोटो पोस्ट केला होता.

ज्यामध्ये तिच्या उजव्या हाताला सलाईन लावण्यात आले होते. ही पोस्ट वाचुन अनेकांना मोठा धक्का बसला होता. तिला खूप मोठी अभिनेत्री म्हणून नाव कमवायचे होते. तिला थिएटरची बरीच आवड होती. तिला त्याच्यात पुढे करिअर करायचे होते.

तिचे आतापासूनच ध्येय गाठण्यासाठी तयारी सुरू होती. निशत सध्या उच्च माध्यमिक शिक्षण घेत होती. तिला खूप शिकायचे होते. इतक्या लहान वयात तिचा झालेला मृत्यू सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक होता.

निशत शेवटच्या श्वासापर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होती. यामुळे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात होती. यामुळे त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. तिच्या मृत्यू डेंग्यूमुळे झाला यावर कोणालाही अजूनही विश्वास बसत नाही.