Ahmednagar Ashti Train : अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. नगर- आष्टी रेल्वेला वाळूंज जवळ आग लागली आहे. पहिल्या दोन डब्यांना लागली होती ती पुढे पाच डब्यांपर्यंत पोहोचली. यामुळे मोठी पळापळ झाली. याबाबत तपास सुरू आहे.
ही आग कशामुळे लागली याबाबत अजून माहिती समोर आली नाही. असे असले तरी गाडीत गर्दी नसल्याने सुदैवाने कोणालाही इजा नाही. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले होते.
एकूण पाच डब्यांना आग लागली आहे. चार वाजताच्या दरम्यान आग विझवण्यात यश आले आहे. दरम्यान, आग कशामुळं लागली याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. या गाडीतील प्रवासी खाली उतरल्याने बचावले आहेत.
आग लागल्याचे समजताच अनेकांनी उड्या मारल्या. सुरुवातीला दोन डब्यांना आग लागली होती. आग लवकरच नियंत्रणात येईल असे, प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
चारच्या दरम्यान आग लागल्याचं सांगितले जात आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत रेल्वेकडून सध्या तपास केला जात आहे.