मोठी बातमी! अजित पवारांनी राष्ट्रवादीचा पहिला अधिकृत उमेदवार केला जाहीर, थेट नावच सांगितलं…

नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. आता सगळे पक्ष कामाला लागले असून उमेदवारी जाहीर केल्या जात आहेत. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे.

आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याबाबत अजित पवारांनी घोषणा केली आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला. त्याबाबतची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यामुळे त्यांच्या विरोधात कोण उभा राहणार हे लवकरच समजेल.

येत्या २८ तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर केला जाईल, असे अजित पवारांनी सांगितले आहे. महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नेमक्या किती जागा मिळणार, याबाबत नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, शिरुर, रायगड आणि सातारा या मतदारसंघासाठी आग्रही आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

या बैठकीत बारामती लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचच लढवणार, असल्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली.