Ajit pawar : अजितदादांना मोठा धक्का! स्वतःच्या गावच्या ग्रामपंचायतीत स्वतःच्याच वार्डमध्ये धक्कादायक पराभव…

Ajit pawar : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी या गावात देखील आज मतमोजणी झाली. यामध्ये पहिल्यांदाच गावात कमळ फुलले असून भाजपचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.

यामुळे गावातच अजित पवारांना जोरदार धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. गावात १६ पैकी १४ जागांवर अजित पवार यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र एक हाती सत्ता असणाऱ्या या ग्रामपंचायतीवर दोन भाजप विचारांचे उमेदवार निवडून आल्याने भाजपने जल्लोष केला.

काटेवाडीत भाजपचा उमेदवार जिंकून आला, हे अधोरेखित करण्यासारखी बाब असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले. यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आली असली तरी भाजपने जोरदार जल्लोष केला.

काटेवाडीच नव्हे तर बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. काटेवाडी हे गाव पवार कुटुंबीयांच्या नावाने ओळखले जाते. गेली अनेक वर्ष काटेवाडी ग्रामपंचायतवर पवार कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. मात्र आता भाजपने आपली विजयी यात्रा सुरू केली आहे.

राष्ट्रवादीमधून बंड केलेले अजित पवार, शिंदे- फडणवीस यांच्या सत्तेत गेले. तरीही महायुतीत एकत्र असलेले शिंदे -फडणवीस आणि पवार यांच्यामध्येच काटेवाडी ग्रामपंचायत जिंकण्यावरून लढत पाहायला मिळाली.

गावात अजित पवार गटाचे प्राबल्य जास्त असल्याने शिंदे गट आणि भाजप अजित पवार गटाच्या आव्हानासमोर टिकू शकले नसल्याचे या निकालावरून दिसून येते. मात्र तरी देखील भाजपने जोरदार टक्कर दिली.