सिल्वर ओकवर अजित पवारांची झाली शरद पवारांशी भेट; म्हणाले, माझं अंतर्मन मला…

अजित पवार यांनी बंड करत शिवसेना भाजपसोबत हातमिळवला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात दोन गट पडले आहे. एक शरद पवारांचा तर दुसरा अजित पवारांचा गट आहे.

असे असताना खातेवाटपानंतर अजित पवार हे शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकला गेले होते. ते जवळपास अर्धातास सिल्वर ओकला होते. त्यावेळी शरद पवारही तिथे उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार यांचे सिल्वर ओकला जाणे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे.

अजित पवार सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता सिल्वर ओकला जाण्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही राजकीय भेट नव्हती तर एक कौटूंबिक भेट होती, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी दिवसवर अनेक काम होती. त्यामुळे मला सिल्वर ओकला जायला जमलं नव्हतं. त्यामुळे रात्री उशिरा तिथे गेलो. माझं अतर्मन म्हणत होतं सिल्वर ओकला गेलं पाहिजे, म्हणून मी गेलो. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असते. मी तिथे माझ्या कुटुंबाला भेटायला गेलो होतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी माझी काकी प्रतिभा पवार यांचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे मला दुपारी जायचं होतं. पण मला काम होतं. त्यामुळे मी रात्री गेलो. दुपारी सुप्रियाचा फोन आला होता. तिच्याशी बोलल्यानंतर मी रात्री तिथे गेलो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आहे आणि कुटुंबाच्या ठिकाणी कुटुंब. आपली भारतीय संस्कृती असून कुटुंबाला आपण पहिले महत्व देत असतो. सिल्वर ओकला मी अर्धा तास थांबलो. तिथे शरद पवारसाहेबही होते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवारसाहेबांशीही मी बोललो. त्यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शरद पवारांनी शिक्षण विभागाला शाळा व्यवस्थेबद्दल एक पत्र दिले होते. त्याबद्दल आमची चर्चा झाली. त्यामुळे शिक्षण विभागाला काय अडचण येतात या समजून घेतल्या जाणार आहे. त्यानुसार आम्ही कारवाई करु, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.