बंडाच्या आधीच अजितदादांनी टाकला होता सर्वात मोठा डाव; आमदार तर गेलेच पण पक्षही पवारांच्या हातून जाणार?

अजित पवारांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी रविवारी शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होत त्यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. तसेच या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ सुद्धा घेतली आहे.

अजित पवार आता पक्षावरच्या नावावर आणि चिन्हावरही दावा करतील, अशी चर्चा होती. असे असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी शपथविधीच्या दोन दिवसाआधीच पक्षावर दावा केल्याचे समोर आले आहे. त्यांनी शपथविधी आधीच निवडणूक आयोगामध्ये याचिका दाखल केली होती.

अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे जी याचिका दाखल केली होती, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदरा आणि खासदारांच्या मिळून ४० सह्या होत्या. त्यामुळे त्यांनी संपुर्ण पक्षावरच दावा केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. त्यांनी शपथविधी आधी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामाही दिला होता.

अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे जी याचिका दाखल केली आहे. त्यावर खासदार आणि आमदार मिळून ४० सह्या आहेत. त्यासोबत ठरावही जोडण्यात आला होता. अजित पवारांचा हा ठराव योग्य असल्याचे म्हणत आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या आणि तो ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता.

शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह दोन्ही जाणार असल्याची चर्चा आहे. पण ४० आमदारांच्या सह्या त्यांच्याकडे असल्यातरी बैठकीला मात्र ३२ आमदारच उपस्थित होते. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, अजित पवारांनी पाठवलेल्या ठरावात अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असल्याचे म्हटलेले होते. अजित पवारांसोबत जयंत पाटील यांनीही निवडणूक आयोगाला मेल पाठवला आहे. त्यामुळे दोन्ही गटांची भूमिका ऐकून घेत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. ही सुनावणी तीन महिने सुरु राहण्याची शक्यता आहे.