अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता अजित पवार आणि शरद पवार असे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पडले आहे. सध्याचे चित्र पाहता अजित पवारांकडे ३३ आमदार आहे, तर शरद पवारांकडे १८ आमदार आहेत.
भाजपने पुढील वर्षी होेणाऱ्या लोकसभा निवडणूकांचा विचार करुन राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार आता भाजपसोबत गेल्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खासदार सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहे. आता अजित पवार त्यांच्यापासून वेगळे झाल्यामुळे आता अजित पवारांशिवाय लोकसभा जिंकण्याचे आव्हान सुप्रिया सुळे यांच्यासमोर असणार आहे.
भाजप कित्येक वर्षांपासून बारातमीचा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत होते. असे असताना आता अजित पवार भाजपसोबत गेले आहे. अजित पवारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आता भाजपला बारामती मतदार संघात निवडून येता येणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील सहापैकी ४ विधानसभा मतदार संघावर अजित पवार गटाचे आणि भाजपचे वर्चस्व आहे. तर दोन मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यातील भोर वेल्हा मुळशी या मतदार संघातील आमदार संग्राम थोपटे आहे. त्यांचे पवार कुटुंबासोबत हवे तितके चांगले संबंध नाही.
तसेच पुरंदर मतदारसंघात विजय शिवतारे आणि अजित पवार समर्थक एकत्र आले, तर सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. तर दोन मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व असल्याने ते सुप्रिया सुळे यांना मदत करु शकतात. पण यावेळी सुप्रिया सुळेंना जास्त कष्ट घ्यावे लागणार आहे.