---Advertisement---

Akola News : डॉक्टरने बाथरुममध्ये जाऊनं केलं भयंकर कृत्य, दरवाजा तोडल्यावर समोरचं दृश्य पाहून सगळेच हादरले

---Advertisement---

Akola News : एका डॉक्टरने राहत्या घरातील शौचलयामध्ये हातावर आणि गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

त्या आजाराला कंटाळूनच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी सिव्हिल पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.

येथील चायना गेट भागातील एका अपार्टमेंटमध्ये गजानन सुरेश बूआ उर्फ कुळकर्णी हे सहकुटुंब वास्तव्यात होते. गजानन हे डॉक्टर असून समर्थ कोचिंग क्लासेसवर नीटच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. ते प्रेमळ आणि शांत स्वभावाचे होते. ते कुटुंबियांना कुणालाही न सांगता घरातून रागाच्या भरात निघून गेले.

त्यांचा कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र कुठलाही सुगावा हाती लागला नाही. अखेर कुटुंबियांनी या संदर्भात सिव्हिल लाईन पोलिसांत त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

दुसऱ्या दिवशी मात्र ते घरी आले. याबाबत ते कुठे होते काय करत होते. याबाबत कोणालाही त्यांनी सांगितले नाही. दरम्यान, दुपारी तीन वाजताच्या सुमारास ते बाथरूमला जाण्यासाठी शौचलयामध्ये बराच वेळ झाल्यानंतर गजानन बाहेर आले नाही.

यामुळे शौचालयाचा दरावाजा तोडण्यात आला. तेव्हा आतील दृश्य पाहून पत्नींला धक्काच बसला. ल गजानन यांनी स्वतः हातावर आणि गळ्यावर चाक़ूने वार करून आत्महत्या केली होती. ते सतत आजारी होते, त्यामुळे ते नेहमी तनावात राहायचे, अशा प्रकारची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---