America : गर्भवती पत्नीवर 17 वेळा चाकूने वार, नंतर अंगावर गाडी घातली, राक्षसी कृत्य केलेल्या नराधमाला कोर्टाने

America : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील न्यायालयाने 2020 मध्ये पत्नीची हत्या केल्याप्रकरणी एका भारतीयाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपीने हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आपल्या नर्स पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे.

अमेरिकन वृत्तपत्र द सन सेंटिनेलनुसार, 2020 मध्ये, आरोपी फिलिप मॅथ्यूने त्याची नर्स पत्नी मेरीन जॉय (26) ची कार हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये थांबवली, तिच्यावर चाकूने 17 वेळा वार केले आणि नंतर घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी जॉयच्या अंगावर गाडी चढवली.

या घटनेनंतर, जॉयच्या सहकर्मचाऱ्याने मीडियाला सांगितले की, मॅथ्यूने तिच्या शरीरावर ‘स्पीड बंप असल्याप्रमाणे’ गाडी चालवली. या कर्मचाऱ्याने पुढे सांगितले की, ते तिला मदत करण्यासाठी तिच्या जवळ आले असता, जॉय वारंवार रडत होती आणि त्यांना सांगत होती, ‘मला एक मूल आहे.’

त्यानंतर जॉयने आपल्या सहकाऱ्यांना हल्लेखोर तिचा असल्याबद्दल सांगतानाच प्राण सोडला. ह्याच एका पुरावाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी, मॅथ्यूजने न्यायालयात प्राणघातक शस्त्राने आपल्या पत्नीच्या फर्स्ट-डिग्री हत्येच्या आरोपांना विरोध केला नाही.

त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, त्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यताही संपुष्टात आली. याव्यतिरिक्त, त्याच्या पत्नीवर प्राणघातक शस्त्राने हल्ला केल्याबद्दल त्याला जास्तीत जास्त पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

आरोपांना मान्य करण्याच्या त्याच्या निर्णयामुळे त्याला फाशीच्या शिक्षेपासून वाचवले असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. त्याची पत्नी मरिन जॉय त्याच्यासोबतचे नाते संपवण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळाली होती, मात्र त्याआधीच मॅथ्यूने तिची हत्या केली.

न्यायालयाच्या निकालानंतर जॉयच्या एका नातेवाईकाने सांगितले की, ‘तिच्या आईला हे जाणून आनंद झाला की तिच्या मुलीचा मारेकरी आयुष्यभर तुरुंगातच राहणार आहे. आणि कायदेशीर प्रक्रिया संपल्याचे कळून त्यांना दिलासा मिळेल.