Amol Shinde: लोकसभेत धुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर लातूरचा अमोल शिंदे काय म्हणाला? पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती…

दिल्लीत आज धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संसदेची सुरक्षा भेदल्याची घटना घडली. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. लोकसभेत बाकांवर या तरुणांनी उड्या मारून धुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रकारानंतर अमोल शिंदेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे आता याची एकच चर्चा सुरू झाली आहे. तो म्हणाला माझा कुठल्याही संघटनेशी संबंध नाही, अमोल शिंदे हा तरुण लातूरचा असून तो पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान, संसदेच्या सभागृहात आणि बाहेर चार जणांनी आंदोलन केलं. या चार जणांपैकी महाराष्ट्रातील एकाचा सामावेश आहे. आता संसदेत आणि बाहेर आंदोलन करणाऱ्या चारही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आता त्यांची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीसाठी पोलीस विशेष टीम तयार करत आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासात उघड झालं की, अमोल आणि नीलम या दोघांना संसदेच्या बाहेरील संकुलात पकडण्यात आले. 

दरम्यान अमोल शिंदे हा लातूरचा आहे. तो पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याने असे का केले याबाबत पोलीस तपास करत आहेत. तो लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामधील झरी (बुद्रूक) येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याची माहिती काढली आहे.

तसेच अमोलचे आईवडील मोलमजुरी करतात. गेल्या अनेक दिवसांपासून तो गावात राहत नव्हता. पोलीस भरतीसाठी तो दुसऱ्या गावाला राहत होता. आता दिल्ली पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.