---Advertisement---

Anil Parab : मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं एका नेपाळ्याला वाटतं, पण..; अनिल परबांचा सभागृहात हल्लाबोल, शेजारी उद्धव ठाकरेंनी..

---Advertisement---

Anil Parab : विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी भाजप सरकार आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी राज्यातील धर्माच्या राजकारणावर टीका करताना एका मंत्र्याचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर खोचक टीका केली.

परब म्हणाले, “महाराष्ट्रात एक नेपाळी आहे, त्याला वाटतंय की मीच हिंदू धर्म वाचवू शकतो.” तसेच, जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावेळी उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित होते.

“हिंदू धर्म वाचवायला आम्ही सक्षम”

परब यांनी स्पष्ट केले की, हिंदू धर्म टिकवण्याची ताकद आमच्यात आहे, पण त्यासाठी आम्ही कोणत्याही दुसऱ्या धर्मावर अन्याय करणार नाही. ते म्हणाले, “हल्ली काही लोक ठरवतात की मांसाहार खायचं की नाही. त्यांना हा अधिकार कुणी दिला? कोणत्या प्रकारचं मटण खायचं हे आम्हाला कोणी शिकवणार?”

परब यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करताना एका नेपाळी वॉचमनशी तुलना केली. ते म्हणाले, “माझ्या सोसायटीत एक नेपाळी वॉचमन आहे, जो रात्रभर ओरडतो आणि वाटतं की तोच आम्हाला सुरक्षित ठेवतो. तसंच एक नेपाळी अंगावर शाल घेऊन फिरतो आणि म्हणतो की मीच हिंदू धर्म वाचवू शकतो. पण हिंदू धर्म वाचवायला आम्ही समर्थ आहोत.”

“निधी वाटपात अन्याय, विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न”

अनिल परब यांनी सरकारवर निधी वाटपात पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “निधीच समान वाटप हा घटनेने दिलेला अधिकार आहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारही निधी वाटपात दुजाभाव करत आहे. माझ्या मतदारसंघातील 100 कोटींच्या कामांसाठी निधी दिला जात नाही, तर काही वॉर्डांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो.”

तसेच, विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला जात नसल्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, “आम्हाला अद्याप विरोधी पक्षनेता का दिला गेला नाही? आम्ही अध्यक्षांना विचारलं, पण ते उत्तर द्यायला तयार नाहीत. जर आम्ही अपात्र ठरत असू, तर तसे स्पष्ट लिहून द्या.”

“सभापती विरोधकांचा आवाज दडपतात”

विधान परिषद सभापतींकडून विरोधी पक्षाच्या आवाजावर दडपशाही होत असल्याचा आरोप करत परब म्हणाले, “आम्ही सभापतींवर अविश्वास ठराव दाखल केला आहे, कारण ते आम्हाला बोलू देत नाहीत. आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळे सरकारला सत्तेचा माज आलाय. विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

त्यांनी विधानपरिषद उपसभापतीवर आणलेल्या अविश्वास ठरावाविषयीही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “नियमांनुसार प्रस्ताव स्वीकारला पाहिजे होता, पण तो नाकारला गेला. कोणत्या कायद्याने तो नाकारला, हे तरी दाखवा!”

अनिल परब यांच्या या घणाघाती टीकेनंतर सभागृहात वातावरण तापलं असून, सरकार या आरोपांना कसा प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---