Ankita Lokhande : मला घटस्फोट दे, मला जे हवं ते…; अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये मोठा वाद…

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सतत चर्चेत असते. तिच्यात आणि विकी जैनमध्ये सतत वाद होताना दिसत आहे. सध्या ‘बिग बॉस 17’ ची चर्चा सुरू आहे. यामध्ये विकी जैनला आयशासोबतचे भांडण हे खूप महागात पडले आहे. यामुळे हा वाद पुढे वाढत गेला आहे.

पुढे विकी आणि आयशामे मस्करीत काही अशा गोष्टींवर चर्चा केली. त्या गोष्टी अंकिताला आवडल्या नाही. हा वाद इतका वाढत गेला की, तिनं थेट विकीला घटस्फोट देण्याचे वक्तव्य केले. आयशा आणि विकी हे दोघे त्याच्या वैवाहिक आयुष्यावर चर्चा करत होते. मात्र पुढे आयशाने विकीला त्याच्या वैवाहिक आयुष्यावर प्रश्न विचारला.

यावर विकी म्हणाला, वैवाहिक पुरुष कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करतो हे कधीच सांगू शकत नाही. यावर आयशा म्हणाली की ‘ती आता लग्न करणार नाही. ती तिच्या वडिलांमुळे लग्न करणार नाही. त्यानंतर अंकिता विकीला विचारते की त्यानं असं वक्तव्य का केलं? यामुळे पुढे वाद निर्माण होतो.

विकी म्हणाला, मी कधीच सांगू शकणार नाही की मला काय वाटतं. मी कोणत्या गोष्टींचा सामना करतो. वैवाहिक पुरुषाला कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो या सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. खूप अडचणी त्याला असतात.

त्यावर अंकिता लगेच म्हणते की सांग तू काय सहन करतोयस माझ्याबद्दल, जर तू इतकंच मला सहन करतोयस, तर माझ्यासोबत का राहतोस. घटस्फोट घेऊया. मला तुझ्यासोबत घरी जायचं नाही, असे तिने म्हटल्यावर एकच वाद पेटतो आणि वाढतच जातो.

यानंतर अंकिता आयशाशी बोलते की ‘मला माहिती आहे की विकी माझ्यावर प्रेम करतो, पण मला त्याच्याकडून जे पाहिजे ते मला मिळत नाही आहेत. यामुळे पुढे तिचा संतापाचा पाराच चढतो. मात्र वाद आणि राग कमी होताना दिसत नाही.

ती म्हणते, अनेकदा मला असं वाटलं की तो मला कंट्रोल आणि डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. मी पाहिलं की जेव्हा पण माझं भांडण कोणत्या पुरुष स्पर्धकासोबत भांडण होतं तेव्हा ती मला कशा प्रकारे थांबवतो, असेही तिने म्हटले आहे.