World cup 2023 : 2023 च्या विश्वचषकात भारताने विजयाचा चौकार मारला आहे. गुरुवारी पुण्याच्या मैदानावर भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. बांगलादेशने 257 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने 41.3 षटकांत तीन गडी गमावून सहज पूर्ण केले.
विराट कोहलीने शानदार शतकी खेळी खेळली. 97 चेंडूत 103 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. केएल राहुलने 34 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 34 धावा केल्या.
कोहलीने विश्वचषक स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना प्रथमच शतक ठोकले आहे. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 48 वे शतक आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा (40 चेंडूत 48, सात चौकार, दोन षटकार) आणि शुभमन गिल (55 चेंडूत 53, पाच चौकार, दोन षटकार) यांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली.
रोहित १३व्या षटकात महमूद हसनने बाद केला तर २०व्या षटकात गिल मेहदी हसन मिराजचा बळी ठरला. श्रेयस अय्यरने 25 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. त्याने 2 चौकार मारले. मिराजने 30व्या षटकात अय्यरला आपल्या जाळ्यात पायचीत केले.
178 धावांवर भारताने 3 विकेट गमावल्या. विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने या सामन्यात विजय साकारला. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड कपमधील दोन गुणांची कमाई केली आहे. यापूर्वी भारताच्या खात्यामध्ये सहा गुण होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचे समान आठ गुण असले तरी भारतासाठी मात्र एक गुड न्यूज आली आहे. कारण या वर्ल्ड कपमध्ये भारत फक्त असा दुसराच संघ ठरला आहे ज्यांना सलग दुसरा सामना जिंकला आला आहे. कारण या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत आठ गुण फक्त दोनच संघांना मिळवता आले आहेत.
त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाने आता एक ठोस पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये पोहोण्यासाठी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे हा विजय भारतासाठी महत्वाचा होता.