मुंबई इंडियन्स मधून रोहित शर्माची कारकीर्द धोक्यात पाड्याचा वेगळाच डाव? जाणून घ्या…

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नुकताच एक सामना खेळला गेला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 ओव्हरमध्ये 169 धावा केल्या. या सामन्यात मात्र मुंबई इंडियन्सच्या सामन्यात प्रेक्षकांना उत्साह दिसून आला नाही. यामुळे नेमकं काय घडलं असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याला कारण मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय. यामुळे मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. हा निर्णय होता प्लेइंग इलेव्हनमधून रोहित शर्माला बाहेर ठेवण्याचा. यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. या सामन्यात मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला अन् रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले.

यामुळे चाहते मोठ्या प्रमाणात संतापले. रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सलामीला मैदानात आला. यामुळे हार्दिक पांड्या सध्या ट्रोल होताना दिसत आहे. हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर सोशल मीडियावर टीका होत आहे. यामुळे पुढील सामन्यात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निमित्ताने आता हार्दिक पांड्याला आता कॅप्टन्सीसाठी रोहित शर्माच्या मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज उरली नाही का? असा सोशल मीडियावर सवाल विचारला जात आहे. यामुळे असा निर्णय नेमका का होतोय असा प्रश्न सध्या चाहते विचारत आहेत.

दरम्यान, पांड्यावर ट्रोलिंग झाली. रोहितने पांड्याला दिलेल्या काही निर्णयाचे फॅन्सने स्वागत देखील केले होते. त्यामुळे रोहित शर्मावर सर्वांची नजर असायची. आता फिल्डिंग करताना रोहित शर्मा मैदानात न दिसल्याने वानखेडेवर नाराजी दिसत होती. फॅन्स अनेकदा यामुळे नाराज झाले आहेत.

सोशल मीडियावर हार्दिकने मुद्दामहून रोहितला बाहेर बसवले, अशी चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्वकाही अलबेल आहे का? असा प्रश्न देखील सध्या विचारला जात आहे. यामुळे यकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.