राज्यातील अजून एक विद्यमान खासदार ठाकरेंकडे येणार, महायुतीला मोठा धक्का…

सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. उमेदवार देण्याचे काम सध्या सर्वच पक्ष करत आहेत. अनेक ठिकाणी मात्र अजूनही उमेदवारी जाहीर केली गेली नाही. अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या संवाद सभेचे सिन्नर येथे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संवाद सभेत शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे संवाद यात्रेत बोलत होते. त्यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर जोरदार टीका केली. याठिकाणी सध्या गोडसेंऐवजी छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची तयारी महायुतीने केली आहे.

यावर बोलताना ठाकरेंसोबत गद्दारी करणाऱ्यांना आता उमेदवारीसाठी मुंबईला फिरावं लागत आहे. हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी न देण्याच्या भूमिकेत सध्या महायुती आहे. यामुळे नाराज खासदार हेमंत गोडसे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेमंत गोडसे यांची तीन माणसं माझ्याकडे येऊन गेली. आम्हाला पदरात घ्या, असे ते म्हणाले. पण मी त्यांना सांगितलं आता गद्दारांना माफी नाही. वेळ निघून गेली आहे, तुम्ही तुमच्या पक्षात परत जा आणि समोरून लढा, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

दरम्यान, हेमंत गोडसे यांना उमेदवारी न देता छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात छगन भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. मात्र याठिकाणी नाराजी आहे.

दरम्यान, सिन्नर येथे संवाद मेळावा घेत वाजे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. हेमंत गोडसे यांना दोन वेळा ठाकरे यांनी उमेदवारी दिली आणि नाशिक लोकसभेचे खासदार केले. मात्र आता परिस्थिती वेगळी झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लावले आहे.