रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद? मुंबईच्या चाहत्यांचे टेंशन वाढले, नेमकं काय झालं?

आयपीएलमध्ये मुंबईने पहिले तीन सामने गमावल्यानंतर अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. या विजयाने आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. यामुळे आता पुढील कामगिरी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याचा या पर्वातील पहिला विजय होता.

टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिककडे दिल्याने रोहित शर्मा नाराज असल्याच्या आणि या पर्वानंतर संघ सोडण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर या विजयानंतर हार्दिकने अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. यामुळे आता बोलणारांची बोलती बंद होणार आहे.

या मुंबई इंडियन्सने २९ धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ५ बाद २३४ धावा केल्या. यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला ८ बाद २०५ धावा करता आल्या. यामुळे टीमचा उत्साह वाढला आहे. दरम्यान, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याच्या मध्ये वाद असल्याची चर्चा सुरू आहे.

काहींच्या मते दोघांमधील वाद अद्याप मिटलेला नाही. हार्दिक म्हणाला, आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. आम्ही मनात पक्कं केलं होतं आणि आम्ही स्वतःवर विश्वास कायम राखला होता. आता आमचा संघ संतुलित व सेट झालेला दिसतोय. हे संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. ड्रेसिंग रुममध्येही प्रचंड प्रेम मिळतंय, काळजी घेतली जातेय.

एकमेकांवर विश्वास ठेवून त्याच्या पाठीशी उभे राहणे, हेच चित्र ड्रेसिंग रुममध्ये आहे. दरम्यान, रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते सध्या खूप नाराज आहेत. शिवाय मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोल करत आहेत.

त्याच्याविरोधात विविध प्रकारचे मीम्स शेअर करत आहेत. आता पुढील सामन्यांमध्ये टीमची परिस्थिती कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका विजयाने चाहते देखील आनंदात आहेत.